क्रीडा

विम्बल्डन स्पर्धेचा विजेता जोकोविचला दिली 'मास्टर ब्लास्टर'ने शाबासकी

२१वे ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

वृत्तसंस्था

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा पराभव करून कारकीर्दीतील सातवे विम्बल्डन जेतेपद पटकाविले. हे काही सोपे काम नाही, अशा शब्दात ‘मास्टर ब्लास्टर’ माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याला शाबासकी दिली.

२१वे ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. सचिनने ट्विट करून जोकोविचला शुभेच्छा देतान लिहिले की, एकूण सात आणि सलग चार विम्बल्डन विजेतेपद मिळविणे ही काही सोपी कामगिरी नाही. जोकोविचचा संयम, एकाग्रता आणि सातत्य हे त्याच्या खेळाचे वैशिष्ट्य आहे. तो निक किर्गिओसला प्रोत्साहन देत होता हे बघूनही आनंद झाला.

सचिन टेनिसचा मोठा चाहता आहे. स्वित्झर्लंडचा टेनिसपटून रॉजर फेडरर आणि सचिन खास मित्रदेखील आहेत. जेव्हा संधी मिळते तेव्हा सचिन टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहत असतो. त्यामुळे जोकोविचने ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर लगेचच सचिनने जाहीरपणे त्याचे कौतुक केले.

सचिन आणि नोव्हाक जोकोविच यांनी युनिसेफच्या एका मोहिमेसाठी एकत्र काम केलेले आहे. या मोहिमेत त्यांनी मुलांच्या विकासात वडिलांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले होते. या मोहिमेत त्यांच्यासोबत डेव्हिड बॅकहॅमदेखील होता.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला