क्रीडा

किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा ;महाराष्ट्राचे दोन्ही संघ गटात अग्रस्थानी

या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी गटातील अग्रस्थानासह बाद फेरीत आगेकूच केली.

Swapnil S

टीपटूर (कर्नाटक) : खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने कर्नाटक खो-खो असोसिएशन आयोजित ३३वी राष्ट्रीय अजिंक्यपद किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा कल्पतरू क्रीडांगण, टीपटूर, कर्नाटक येथे सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी गटातील अग्रस्थानासह बाद फेरीत आगेकूच केली.

दुसऱ्या दिवशी मेघालय व नागालँड या राज्यांतील दोन्ही संघांचे खेळाडू सामन्यासाठी अनुपस्थित राहिल्याने महाराष्ट्राला पुढे चाल देण्यात आली. त्यापूर्वी, बुधवारी रात्री किशोर गटात महाराष्ट्राने तेलंगणाला ३६-३२ असे ४ गुण व २ मिनिटांच्या फरकाने नमवले. ओमकार सावंत (१ मिनिट संरक्षण व आक्रमणात ४ गडी), भीमसिंग वसावे (१ मि., २ गडी) यांनी सुरेख खेळ केला. किशोरी गटातील सलामीच्या लढतीत महाराष्ट्राने झारखंडचा ३४-१२ असा १ डाव व २२ गुणांच्या फरकाने धुव्वा उडवला. कर्णधार मैथिली पवार (३.२० मि., १२ गडी), समृद्धी सुरवसे (२.२० मि., ८ गडी) यांनी अष्टपैलू चमक दाखवली.

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर लष्करात पुन्हा स्थान; प्रसाद पुरोहित यांची कर्नल पदी बढती

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून