Twitter/@BCCI
Twitter/@BCCI 
क्रीडा

एकदिवसीय मालिकेत भारताकडून झिम्बाब्वेचा 3-0 असा पराभव

वृत्तसंस्था

भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वेचा 3-0 असा पराभव केला. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 13 धावांनी विजय मिळवला. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 8 गडी गमावत 289 धावा केल्या. यानंतर सिकंदर रझा (115) याच्या शतकी खेळीनंतरही झिम्बाब्वेचा संघ 49.3 षटकांत 276 धावांत सर्वबाद झाला.

290 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला डावाच्या तिसऱ्या षटकात इनोसंट केया (6) दीपक चहरने एलबीडब्ल्यू आऊट केल्यावर पहिला धक्का बसला. यानंतर शॉन विल्यम्स (45) आणि ताकुडझवंशे कीतानो (13) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. विल्यम्सने 46 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. कर्णधार रेगिस चकाबवाही फार काही करू शकला नाही आणि 16 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. सलामीवीर कॅटानो 5वी विकेट म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतला पण त्याने 22 चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने केवळ 13 धावा केल्या. झिम्बाब्वेच्या 5 विकेट 122 धावांवर पडल्या.

याआधी शुभमन गिलने कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याने 97 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 130 धावा केल्या. गिल आणि इशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली. किशनने 61 चेंडूत 6 चौकारांसह 50 धावा केल्या. या मालिकेत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग