ठाणे

४ वर्षीय मुलाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडल्याने खळबळ

आईच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी विकिन्याशचा शोध सुरू केला होता.

Swapnil S

भिवंडी : शहरातील वाजा मोहल्ल्यातील महापालिका कर्मचारी कॉलनीतील २ दिवसांपासून हरवलेल्या ४ वर्षीय मुलाचा इमारतीतील पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. वपोनि महादेव कुंभार यांनी सांगितले की, मयत विकिन्याश गोपाल चव्हाण (४) हा आई वडिलांसह आजी-आजोबा यांच्यासोबत राहत असून तो शुक्रवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार खेळण्यासाठी बाहेर गेला होता. परंतु रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. दरम्यान कुटुंबीयांनी मुलाचा शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर मयत विकिन्याशच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी विकिन्याशचा शोध सुरू केला होता.

दरम्यान, रविवारी दुपारी ३ वाजता त्याचा मृतदेह तो राहत असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला आहे. तर या घटनेबाबत वपोनि कुंभार यांनी सांगितले की, घटनास्थळी पाण्याच्या टाकीचे झाकण अर्धे उघडे असल्याने बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. यासह घटनेचा चौफेर तपास शहर पोलीस करीत आहेत.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत