ठाणे

कर्जत नगरपरिषदेस पाणीपुरवठा योजनेसाठी ५८.२ कोटी मंजूर

कर्जत नगरपरिषदेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सर्वसाधारण सभेत ज्या मैदानावर अखंड हरिनाम सप्ताह गेले ३७ वर्ष संपन्न होतो.

Swapnil S

कर्जत : कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेमध्ये कर्जत शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. पाणी पुरवठा कर्जत शहरात होत असताना अनेक प्रभागात कमी दाबाने येत असल्याने तसेच बरेच ठिकाणी जुने झालेल्या लाईन्स, वाढत्या लोकसंख्येनुसार आवश्यक असणाऱ्या साठवणूक टाक्या, आणि इतर समस्या बघता शासनाकडून नवीन योजना मंजूर करून घेण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तांत्रिक मान्यता झाली होती आणि आता त्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून ५८.२ कोटी निधी मंजूर झाला. त्याचबरोबर आंबेडकर भवनासाठी ५ कोटी आणि स्वर्गीय अनंता काका जोशी भुयारी मार्ग योजनेसाठी (१५ कोटी) आलेल्या निधीवरील स्थगिती उठवणे बाबत एमएमआरडीए आयुक्त यांना मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलेले असून, त्यासाठी नगरसेवक राहुल डाळिंबकर यांनी नगराध्यक्ष तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या अभिनंदनाचा ठराव सभागृहात घेतला.

कर्जत नगरपरिषदेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सर्वसाधारण सभेत ज्या मैदानावर अखंड हरिनाम सप्ताह गेले ३७ वर्ष संपन्न होतो. त्या पोलीस ग्राउंडला 'माऊली मैदान' असे नाव देण्याचे ठराव पारित करून तो पुढील मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्याचे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे कैची घाटास 'राधाकृष्ण घाट' नाव देण्यास सर्वानूमते मंजुरी देण्यात आली. सदर सभेत सभापती विवेक दांडेकर, वैशाली मोरे तसेच नगरसेवक बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, नगरसेविका मधुरा चंदन, भारती पालकर, पुष्पा दगडे यांनी देखील चर्चेत भाग घेतला. यावेळेस नगरसेविका प्राची डेरवणकर, संचिता पाटील, विशाखा जिनगरे, ज्योती मेंगाळ, हेमंत ठाणगे, नगरपालिका अधिकारी, कर्मचारी वर्ग सदस्य उपस्थित होते.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले