ठाण्यातील ९४ टक्के रिक्षाचालक मराठीबहाद्दर; RTO च्या तपासणीत उघड  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

ठाण्यातील ९४ टक्के रिक्षाचालक मराठीबहाद्दर; RTO च्या तपासणीत उघड

महाराष्ट्रात सार्वजनिक सेवेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असावे, या राज्य शासनाच्या भूमिकेनुसार ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) रिक्षाचालकांची विशेष तपासणी मोहीम राबवली.

Swapnil S

ठाणे: महाराष्ट्रात सार्वजनिक सेवेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असावे, या राज्य शासनाच्या भूमिकेनुसार ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) रिक्षाचालकांची विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत २३१७ रिक्षाचालकांची तपासणी केली. यात ९४ टक्के रिक्षा चालकांना मराठीत येत असल्याचे उघड झाले. केवळ १४२ चालकांना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान नसल्याचे आढळून आले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाने रिक्षा व टॅक्सीचालकांना स्थानिक भौगोलिक माहितीबरोबरच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक केले आहे. त्यानुसार ठाणे आरटीओकडून शहरातील विविध भागांत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत चालकांचे परवाने, बॅज, कागदपत्रांची पडताळणी करण्यासोबतच त्यांना मराठीत संवाद साधता येतो का, प्रवाशांनी सांगितलेले पत्ते समजतात का, तसेच दैनंदिन व्यवहार मराठीत करता येतात का, याचीही तपासणी करण्यात आली.

प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केलेल्या तपासणीदरम्यान बहुतांश रिक्षाचालकांना मराठीत सहज संवाद साधणे शक्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे ठाणे शहरातील रिक्षाचालकांमध्ये मराठी भाषेबाबत जागरूकता वाढत असल्याचे सकारात्मक चित्र समोर आले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेत स्थानिक भाषेचा वापर वाढल्यास प्रवाशांनाही अधिक सुलभ आणि विश्वासार्ह सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे मत परिवहन विभागाकडून व्यक्त करण्यात आले.

मुंबईतील प्रवेशद्वारावर पार्किंग हब; पालिका १५०० कोटी रुपये खर्च करणार

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड : ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर हातोडा

IIT मुंबईच्या प्लेसमेंटमधील वेतनामध्ये वाढ; नोकरीच्या संधीमध्ये किंचित घट, वेतनामध्ये तब्बल १० टक्क्यांनी वाढ

Mumbai : पश्चिम उपनगरातील रस्ते होणार खड्डेमुक्त; मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर करणार

Thane : बॅडमिंटन हॉल विस्तार वादाच्या भोवऱ्यात; ४४ कोटींचा खर्च ५५ कोटींवर