ठाणे

भिवंडीमध्ये नऊ वर्षांच्या चिमुरडीची अत्याचार करून हत्या; शेजारच्या नराधमाला अटक

Swapnil S

भिवंडी : शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने नऊ वर्षांच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करीत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील एका दोन मजली चाळीतील नराधमाच्या घरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलीस पथकाने फरार झालेल्या नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. अभय यादव (४२) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मृतक पीडित चिमुरडी भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील एका दुमजली चाळीत कुटुंबासह राहत होती. आई, वडील दोन मोठ्या बहिणी व एक भाऊ व सर्वात छोटी पीडिता असे कुटुंब त्याठिकाणी वास्तव्यास आहेत. मृतकचे वडील यंत्रमाग कारखान्यात तर आई गोदामात कामाला होती. कामाला जाताना आई आपल्या दोन्ही मोठ्या मुलींनासुध्दा सोबत घेऊन जात होती. तर भाऊ शाळेत जात होता. त्यातच गुरुवारी ५ जुलै रोजी सुद्धा हे कुटुंब नेहमी प्रमाणे कामाला गेले. तर मुलगा दुपारी शाळेत गेला असताना त्या सुमारास त्याच चाळीच्या वरच्या मजल्यावर एकटाच राहणाऱ्या नराधमाने मृतक चिमुरडीस खाऊचे आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावले. खाऊच्या बहाण्याने मृतक मुलगी नराधमाच्या खोलीत गेल्यावर नराधमाने तिच्यावर अत्याचार करून धारदार वस्तूने वार करून तिची निर्घृण हत्या केली.

दरम्यान, सायंकाळी शाळेतून मृतक मुलीचा भाऊ घरी आला, तेव्हा खोलीला कुलूप बघून त्याने बहिणीचा शोध घेतला मात्र त्यास ती आढळून नाही आली. त्यानंतर आई व मोठ्या बहिणी कामावरून घरी परतल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध सुरू केली असता परिसरातील एका छोट्या मुलाने पीडित मुलीला ती राहत असलेल्या वरच्या मजल्या वरील खोलीत जाताना बघितल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेतला असता एका बाहेरून कडी लावलेल्या खोलीत पीडितेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला निदर्शनास आला. हे दृश्य पाहिल्यावर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तपासणीसाठी येथील शासकीय इंदिरा गांधी रुग्णालयात रवाना केला. याबाबत पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला असता, नराधम आरोपीला काही तासातच अटक केली आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था