ठाणे

उरण, न्हावा-शेवात २,४५० वाहनचालकांवर कारवाई; नोव्हेंबर महिन्यात २४ लाख ५० हजारचा दंड वसूल

न्हावा-शेवा वाहतूक शाखेच्या वतीने अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहनचालकांना रहदारीची शिस्त लावण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर उरण वाहतूक आणि न्हावा-शेवा वाहतूक विभागाने नोव्हेंबर महिन्यात २,४५० वाहन चालकाविरुद्ध कारवाई करत २४ लाख ५०हजार इतक्या रकमेचा दंड वसूल केला आहे.

Swapnil S

उरण : न्हावा-शेवा वाहतूक शाखेच्या वतीने अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहनचालकांना रहदारीची शिस्त लावण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर उरण वाहतूक आणि न्हावा-शेवा वाहतूक विभागाने नोव्हेंबर महिन्यात २,४५० वाहन चालकाविरुद्ध कारवाई करत २४ लाख ५०हजार इतक्या रकमेचा दंड वसूल केला आहे.

वाहतूक आणि न्हावा-शेवा वाहतूक विभागामार्फत विशेष मोहीम आखण्यात आली होती. यामध्ये बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याचा तसेच अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी नोव्हेंबर महिन्यात आत्तापर्यंत मोटर वाहन कायद्याखाली एकूण २,४५० वाहन चालकाविरुद्ध विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई करण्यात

आली असून संबंधित वाहनचालकांना एकूण २४ लाख ५०हजार इतक्या रकमेचा दंड आकारण्यात आला आहे.

न्हावा-शेवा वाहतूक विभागाच्या कारवाई अंतर्गत नोव्हेबर महिन्यात बिना हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्या ९५० चालकाविरुद्ध, तसेच रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी चारचाकी व अवजड वाहने पार्क करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या १,२५० वाहनचालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

उरण वाहतूक विभाग अंतर्गत नोव्हेंबरमध्ये एकूण केसेस ३०३७ करण्यात आल्या आहेत. यामध्ये, हेल्मेट, सिटबेल्ट, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने, रॉंग साईट ट्रिपल सीट अशा कलमाखाली कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण दंड २७ लाख ८६ हजार ७५० रुपयाचा आकरण्यात आला आहे. ड्रंक अँड ड्राइव्हच्या ही एकूण सहा केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.

कायद्याचे पालन करण्याचे आवाहन

उरण जेएनपीटी तसेच उलवे परिसरातील वाहन चालकांनी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहने चालवताना स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोटरवाहन कायद्याचे पालन करावे, असे आवाहन न्हावा -शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर आणि उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी केले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक