ठाणे

५० कोटीचा पाऊस पाडतो म्हणून ५६ लाखांचा चुना,६ जण फरार

सुरेंद्र हे बांधकाम व्यावसायिक असून दावडी गावातल्या पाटीदार भवन येथे त्यांचे कार्यालय आहे

प्रतिनिधी

५० कोटी रुपयांचा पाऊस पाडतो म्हणून ५६ लाखांचा चुना लावून पुजाऱ्यासह ६ जण फरार झाले. या प्रकरणी फसगत झालेल्या बांधकाम व्यावसायिकाने मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या संदर्भात चोळेगाव-ठाकुर्लीतील अनुसया बिल्डींगमध्ये राहणारे सुरेंद्र पाटील (५१) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सुरेंद्र हे बांधकाम व्यावसायिक असून दावडी गावातल्या पाटीदार भवन येथे त्यांचे कार्यालय आहे.

गणेश, शर्मा गुरूजी, अशोक गायकवाड, महेश आणि रमेश मोकळे या पाच जणांनी आपसात संगनमत करून सुरेंद्र यांना ५० करोडचा पाऊस पाडून देतो असे अमिष दाखवुन त्याकरीता ५६ लाख रूपये आणण्यास सांगितले. शनिवारी सकाळच्या सुमारास गणेश, शर्मा गुरूजी आणि अशोक गायकवाड यांनी सुरेंद्र यांच्या कार्यालयात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पुजा केली. त्यानंतर इमारतीला प्रदक्षिणा मारून येतो, असा बहाणा करून ५६लाखांच्या रक्कमेसह पळ काढला. या प्रकरणी फसगत झालेल्या सुरेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च