ठाणे

ज्येष्ठ नागरिकाचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

उल्हासनगर येथील एका ज्येष्ठ नागरिकाने आजाराला कंटाळून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर येथील एका ज्येष्ठ नागरिकाने आजाराला कंटाळून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली. सदर व्यक्तीवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर चार परिसरात जगदीश चव्हाण (६०) हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचा बाटली बंद पाणी विकण्याचा व्यवसाय आहे. मात्र कोरोनानंतर चव्हाण हे सतत आजारी राहत असल्यामुळे ते त्रस्त झाले होते. मात्र शनिवारी सकाळी घरात कोणी नसतांना चव्हाण यांनी आपल्याजवळील बंदुकीने छाती आणि पोटाच्या मध्यभागी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांनी नेमकी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? हे अद्याप कळू शकले नसल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी सांगितले. तर ज्या बंदुकीने त्यांनी स्वत:वर गोळी झाडली, त्याबाबतचे कुठलेही पुरावे अद्याप पोलिसांकडे सादर केले नसल्याने ते अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत