ठाणे

ग्रामपंचायतीकडून ‘बाकडे’ खरेदी घोटाळा: अतिरिक्त दराने बाकडे खरेदी; निविदा न काढताच लाखोंचे व्यवहार

उच्च दर्जाची बाकडे खरेदी कागदावर दाखवून प्रत्यक्षात दुय्यम दर्जाचे बाकडे खरेदी करण्यात आले आहेत.

Swapnil S

पालघर : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा तालुक्यांमध्ये खरेदी संहिता डावलून ग्रामपंचायतीकडून अतिरिक्त दराने बाकडा खरेदी केल्याने पालघर जिल्ह्यात 'बाकडे' खरेदी व्यवहार वादात सापडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, किसान सभेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत घोरखाना यांनी या विषय लावून धरल्याने बाकडा खरेदी अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत. लाखोंचा खरेदी घोटाळा बाहेर येण्याची चिन्हे आहेत.

ग्रामसेवकांना आर्थिक देवाणघेवाण करण्याचे अधिकार असल्याने पालघर जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतमध्ये रहिवाशांची मागणी नसताना ठेकेदाराशी संगमत करून कोणत्याही प्रकारची निविदा न काढता बाकडे खरेदी केली. विशेष म्हणजे, बाकडे खरेदी करताना ग्रामपंचायतींनी खरेदी संहिता डावलून अतिरिक्त दराने नियमबाह्य पद्धतीने केल्याने पालघर जिल्ह्यात 'बाकडे' खरेदी व्यवहार वादात सापडला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी या खरेदी घोटाळ्याकडे लक्ष्य देण्याची मागणी होत आहे.

अधिकाऱ्यांकडून संगनमताने निधीचा अपहार

उच्च दर्जाची बाकडे खरेदी कागदावर दाखवून प्रत्यक्षात दुय्यम दर्जाचे बाकडे खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पालघर जिल्हा परिषद अंतर्गत बाकडे खरेदी व्यवहार वादात सापडले आहे. आस्थापनेतील अधिकारी संगनमताने शासन निधीचा अपहार करत आहेत आणि लोकप्रतिनिधी अशा भ्रष्ट प्रवृत्तींना पाठीशी घालत असल्यानेच दिवसेंदिवस घोटाळ्यांमध्ये वाढ होत आहे. तर काही आस्थपनेतील अधिकाऱ्यांनीच हा जोड धंदा सुरू करून ग्रामपंचायतींना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ग्रामपंचायतीचे अधिकारी नियमबाह्य पद्धतीने खरेदी व्यवहार करत असताना कठोर कारवाई होत असल्यानेच जनतेचा पैसा गिळंकृत करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

- रामदास हरवटे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले