भिवंडीत फर्निचरच्या गोदामाला भीषण आग छायाचित्र सौ.- sumit gharat
ठाणे

भिवंडीत फर्निचरच्या गोदामाला भीषण आग; आगीत १२ गोदामे जळून खाक; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर

भिवंडी : भिवंडीत आगीच्या घटनांचे सत्र सुरू असतानाच तालुक्यातील राहनाळ गावच्या हद्दीतील एका मोठ्या प्रमाणात फर्निचर साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून या आगीत संपूर्ण इमारतीतील १२ गोदामे जळून खाक झाली. या आगीत सुदैवाने फक्त वित्तहानी झाली असून जीवितहानी टळली आहे.

Swapnil S

भिवंडी : भिवंडीत आगीच्या घटनांचे सत्र सुरू असतानाच तालुक्यातील राहनाळ गावच्या हद्दीतील एका मोठ्या प्रमाणात फर्निचर साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून या आगीत संपूर्ण इमारतीतील १२ गोदामे जळून खाक झाली. या आगीत सुदैवाने फक्त वित्तहानी झाली असून जीवितहानी टळली आहे. परंतु सदरची भीषण आग आटोक्यात आणत असताना भिवंडी अग्निशमन दलाचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या आगीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील राहनाळ गावच्या हद्दीतील स्वागत कंपाऊंडमधील फर्निचरच्या गोदामाला शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, पाहता पाहता इमारतीतील आजूबाजूची १२ गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून फर्निचरची संपूर्ण इमारत जळून खाक झाली. तर आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या २ गाड्या आणि कल्याण व ठाणे अग्निशमन दलाची प्रत्येकी १ गाडी अशा ४ गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्याची माहिती भिवंडी अग्निशमन दलाने दिली असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रयत्न पहाटे पासूनच सुरू होते.

त्यानंतर धगधगत्या आगीत धुराचे लोट आकाशात पसरले होते. परंतु अग्निशमन पथकाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न केले. दुपारच्या सुमारास भिवंडी अग्निशमन दलातील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. हरिश्चंद्र वाघ (५४) असे अग्निशमन कर्मचाऱ्याचे नाव असून त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ९ ते १० तासांचा अवधी

आगीमध्ये फर्निचरची पूर्ण इमारत भक्ष्यस्थानी पडल्याने तीन मजली इमारतीच्या गोदामाच्या भिंतीही कोसळण्यास सुरुवात होउन हळूहळू संपूर्ण इमारत अग्निमय होत कोसळली. परंतु सुदैवाने या भीषण आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र फर्निचर जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले असून या आगीचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. भीषण स्वरूपात लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ९ ते १० तासांचा अवधी लागणार असल्याची माहितीही अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video