भिवंडीत चिकन शोरमामुळे ८० जणांना विषबाधा; दोन बालकांना ठाण्यात हलवले 
ठाणे

भिवंडीत चिकन शोरमामुळे ८० जणांना विषबाधा; दोन बालकांना ठाण्यात हलवले

शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील ए. के. शोरमा शॉपमधील चिकन शोरमा खाल्ल्याने ८० जणांना अन्नविषबाधा झाली आहे. या रुग्णांमध्ये ३९ पुरुष, २५ महिला आणि १६ लहान मुलांचा समावेश आहे.

Swapnil S

भिवंडी : शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील ए. के. शोरमा शॉपमधील चिकन शोरमा खाल्ल्याने ८० जणांना अन्नविषबाधा झाली आहे. या रुग्णांमध्ये ३९ पुरुष, २५ महिला आणि १६ लहान मुलांचा समावेश आहे. सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, दोन बालकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी ठाण्यात हलविण्यात आले आहे.

सोमवारी शोरमा खाल्ल्यानंतर मंगळवारी दुपारपासून नागरिकांना उलट्या, जुलाब आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत बुधवारी सायंकाळपर्यंत ८० वर पोहोचली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानुसार उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधातही विशेष पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : अपघात रोखण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा! हायकोर्टाचे रेल्वे, राज्य सरकारला निर्देश

ठाण्यातील टँकरना GPS यंत्रणा; टँकर माफियांच्या मनमानीला चाप, ऑनलाइन बुकिंगची सुविधा

Dombivli : आरोग्य विभागाची घरोघरी जाऊन पाहणी; MIDC परिसरातील पाण्याची होणार तपासणी

'पक्षप्रवेश करायचा तर उघडपणेच करेन'; शिंदेंच्या बैठकीत संदेश पारकरांची उपस्थिती

राज्यात घोंघावतेय जलसंकट! पाणीसाठ्यात २८ टक्क्यांनी घट