ठाणे

भिवंडीत महापौरपदासाठी दहा, तर उपमहापौरपदासाठी सात अर्ज दाखल

भिवंडी मनपा महापौर व उपमहापौरपदाच्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात आले.

Swapnil S

भिवंडी : भिवंडी मनपा महापौर व उपमहापौरपदाच्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी महापौरपदासाठी भाजपचे तीन, शिंदे सेनेचे दोन, काँग्रेसचा एक तर कोणार्क विकास आघाडीचे तीन तसेच भिवंडी विकास आघाडीचा एक असे एकूण दहा उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत, तर उपमहापौर पदासाठी शिंदे सेनेने एक, भाजपने एक, काँग्रेसने एक समाजवादीने एक, कोणार्कने एक, भिवंडी विकास आघाडीने दोन असे एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महापौरपदासाठी भाजपकडून नारायण चौधरी यांनी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असून भाजपच्या स्नेहा पाटील यांनी देखील महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदे सेनेकडून बाळाराम चौधरी व सुचिता म्हात्रे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून तारिक मोमीन तर कोणार्क विकास आघाडीकडून माजी महापौर विलास पाटील, प्रतिभा पाटील व मयुरेश पाटील या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर उपमहापौर पदासाठी शिंदे सेनेकडून अस्मिता नाईक, काँग्रेसकडून तारिक मोमीन, भाजपकडून सुहास नकाते, समाजवादीकडून अरीब शेख, कोणार्ककडून मयुरेश पाटील, तर भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करतांना शिंदेसेनेचे नेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, भाजपचे शहराध्यक्ष रवी सावंत, गट नेते संतोष शेट्टी, नगरसेवक सुमित पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर मोमीन, समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना जयपूर आंदोलनात मारहाण; Video व्हायरल, घटनेनंतर दिपके यांची पोस्ट चर्चेत

२२ व्या वर्षी जगाचा निरोप; अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरीच संपवलं जीवन, पोलीस तपास सुरू

गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं

NCERT च्या नव्या पाठ्यपुस्तकातील 'डान्सिंग गर्ल'वरून वाद; मोहेंजोदडोची मूळ प्रतिमा बदलल्याची चर्चा

रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत