Bhiwandi : उमेदवारांना अनधिकृत बांधकामाबाबत शपथपत्र बंधनकारक संग्रहित छायाचित्र
ठाणे

Bhiwandi : उमेदवारांना अनधिकृत बांधकामाबाबत शपथपत्र बंधनकारक

नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर बहुतांश नगरसेवकांचा व्यवसाय बांधकाम व्यावसायिक असा होत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे आता निवडणूक जिंकून येणाऱ्या नगरसेवकांना बांधकाम व्यवसाय करताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

Swapnil S

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्र अनधिकृत बांधकामांच्या बजबजपुरीसाठी ओळखले जाते. केवळ इतकेच नव्हे, तर अनेक अनधिकृत बांधकामांमध्ये विद्यमान नगरसेवक किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा थेट अथवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत. या पार्श्वभूमीवर, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांनी अनधिकृत बांधकाम केलेले नाही, तसेच भविष्यात करणार नाही, याबाबत शपथपत्र देणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे.

नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर बहुतांश नगरसेवकांचा व्यवसाय बांधकाम व्यावसायिक असा होत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे आता निवडणूक जिंकून येणाऱ्या नगरसेवकांना बांधकाम व्यवसाय करताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाच्या उमेदवारी अर्जातील अट क्रमांक १६ (५) नुसार, उमेदवाराने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १० तसेच मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६ मधील तरतुदींचे वाचन करून, त्यानुसार आपण महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अपात्र नसल्याचे जाहीर करणे आवश्यक आहे.

तसेच, “मी स्वतः किंवा माझी पत्नी/माझे पती अथवा माझे अवलंबित यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही,” असे स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १० (१९) किंवा मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६ (१-ड) मधील तरतुदीनुसार, निवडून आल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यास आपण नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र ठरू, याची जाणीव असल्याचे प्रतिज्ञापत्र उमेदवारांना द्यावे लागणार आहे.

उमेदवारी अर्ज भरताना हे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक केल्याने, भविष्यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकप्रतिनिधी नगरसेवकांवर कारवाई करण्यास प्रशासनाला मोठा आधार मिळणार असून, अशा प्रकारच्या गैरप्रवृत्तींना अटकाव करणे शक्य होणार आहे.

बदलीच्या तक्रारीसाठी पोलिसांना कार्यालयात आणणे गैरवर्तन; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण! ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम, पुढील ४८ तास महत्त्वाचे

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार