भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा 
ठाणे

शहापूर, मुरबाड, भिवंडी पश्चिम विधानसभा शरद पवार गट लढविणार? भिवंडीतील तीन मतदारसंघांवर खासदार बाळ्या मामांचा दावा

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद वाढविण्यासाठी विधानसभानिहाय मतदारसंघांमध्ये राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.

Sagar Sirsat

भिवंडी : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद वाढविण्यासाठी विधानसभानिहाय मतदारसंघांमध्ये राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, शहापूर, मुरबाड व कल्याण पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीन विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. भिवंडी पश्चिम, शहापूर व मुरबाड या तीन विधानसभांवर आम्ही दावा करणार आहोत,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

खासदार म्हात्रे यांनी दावा केलेले तीनही विधानसभा मतदारसंघ सध्या महायुतीकडे असून या तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजप व अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. भिवंडी पश्चिम मतदारसंघात भाजपचे आमदार महेश चौघुले, मुरबाडमध्ये भाजपचे आमदार किसन कथोरे तर शहापूरमध्ये अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचे व महायुतीचे वर्चस्व असल्यानेच या तीनही मतदारसंघावर आम्ही दावा केला असल्याचे स्पष्टीकरण खासदार म्हात्रे यांनी दिले आहे.

भिवंडी पश्चिम मतदारसंघावर आम्ही सर्व ताकदीनिशी दावा करणार असून विधानसभेच्या २००४, २००९, २०१४, २०१९ या सर्व विधानसभेचा मागील वीस वर्षांचा इतिहास व निवडणुकांचा निकाल पाहिल्यास या वीस वर्षात भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला नाकारले आहे. मुस्लिम मतदार कधीही काँग्रेसच्या बाजूने नव्हता, मुस्लिम मतदार हा नेहमी आघाडी सरकारच्या बाजूने व आता महाविकास आघाडीच्या बाजूने राहिला आहे. त्यातच मागील दहा वर्षात लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीत देखील येथून काँग्रेसला अपयश आल्याने भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघावर आमचा प्रबळ दावा असल्याचे मत खासदार म्हात्रे यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. माजी महापौर विलास पाटील हे काँग्रेसमधून भिवंडी पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी म्हात्रे यांना विचारले असता भिवंडी शहरातून काँग्रेस संपविण्याचे काम विलास पाटील यांनीच केले असून काँग्रेसने त्याच विलास पाटलांना पक्षात प्रवेश दिला आहे.

विलास पाटील यांचा भाजपला पाठिंबा

भिवंडी महापालिकेवर एकहाती काँग्रेसची सत्ता असताना विलास पाटलांनी काँग्रेसचे १८ नगरसेवक फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. २०१४, २०१९ व २०२४ च्या लोकसभा व झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील विलास पाटील यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन काँग्रेसला नेमकी काय साध्य करायचे आहे.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे