ठाण्यात भाजपला डावलल्याचा आरोप; 'सात प्रकल्पांचे पुन्हा उद्घाटन करा', आयुक्तांना पत्र 
ठाणे

ठाण्यात भाजपला डावलल्याचा आरोप; 'सात प्रकल्पांचे पुन्हा उद्घाटन करा', आयुक्तांना पत्र

मनपातील महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. रविवारी झालेल्या सात विकास प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यांत भाजपच्या आमदारांना आणि उपमहापौरांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला आहे.

Swapnil S

ठाणे : मनपातील महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. रविवारी झालेल्या सात विकास प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यांत भाजपच्या आमदारांना आणि उपमहापौरांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला आहे.

या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी आयुक्तांना पत्र पाठवून सातही प्रकल्पांचे पुन्हा उद्घाटन भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्याची मागणी केली आहे.

उपमहापौर पाटील यांनी पत्रात म्हटले की, ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता असताना केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या निधीतून उभारलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी महायुतीतील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे अपेक्षित होते. मात्र, भाजपच्या आमदारांसह उपमहापौरांनाच निमंत्रण न देणे हे राजकीय हेतूने केलेले कृत्य असल्याचा आरोप त्यांनी केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

मुंबई 'पाताळलोक'चे काम वेगवान; ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह भुयारी बोगद्याचे ६५० मीटर खोदकाम पूर्ण

३६४ बसवाहकांची BEST मध्ये सरळसेवा भरती; १ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Mumbai : नगरसेवक रमेश म्हात्रे प्रकरणाचा तपास आता डीसीपींकडे; डॉक्टरांना मारहाण करणे चांगलेच भोवले

FDA ची कारवाई बेकायदेशीर; दूध विक्रेत्यांचे परवाने निलंबनाच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती