ठाणे

ठाणे-कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने एक महिना होऊन गेला तरी अद्याप मंत्रिमंडळाच्या स्थापनेसाठी तारीख पे तारीख सुरू आहे

वृत्तसंस्था

राज्यात महिनाभरापूर्वी सत्ताबदल झाला असून भाजपच्या मदतीने शिवसेनेतील एका गटाचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने एक महिना होऊन गेला तरी अद्याप मंत्रिमंडळाच्या स्थापनेसाठी तारीख पे तारीख सुरू आहे. मात्र दुसरीकडे राज्यात सत्ताबदल होताच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपणे सुरु केली असून शिवसेना भाजपच्या सत्तेच्या सारीपाटात ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ जे शिवसेनेने स्वतःकडे खेचून घेतले होते, ते पुन्हा आपल्याकडे घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. राज्यातील सर्व ४८ मतदारसंघात भाजपचे कमळ फुलणार असे स्पष्ट करत मुख्यमंत्री पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हेही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढू शकतात असा अप्रत्यक्ष दावा भाजपचे सरचिटणीस तथा माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

अगदी काही वर्षापूर्वी ठाणे जिल्हा हा भाजपचा गड समजला जायचा परंतू गेल्या दशकात शिवसेनेमागे भाजपची फरफट सुरू होती. आठ वर्षांपूर्वी केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच बहुमतातील भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि राज्यातील भाजपला स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव झाली. त्याचमुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवून राज्यात सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान भाजपने मिळवला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप एकत्र लढले भाजपला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या शिवसेनेला ५५ जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा शिवसेना भाजपचे सरकार सत्तेवर येणार असे चित्र असताना शिवसेनेला अडीज वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपणे नकार दिला. दरम्यान गेल्या महिन्यात शिवसेनेच्या ४० आणि अपक्ष १० आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यात सत्ताबदल झाला असून शिवसेनेच्या फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. राज्यात सध्या भाजप असल्याने आपले गेलेले वैभव परत मिळवण्याची स्वप्ने भाजप नेतृत्वाला पडू लागली असून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास भाजप नेतृत्वाने सुरवात केली आहे.

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन

बराक ओबामांच्या Favourite Songs 2025 यादीत मराठमोळे ‘पसायदान’; जयंत पाटील म्हणाले, "आध्यात्मिक विचार जागतिक पातळीवर...

"हा अवॉर्ड आईसाठी!" जीवनातला पहिला-वहिला पुरस्कार स्वीकारताना आर्यन खानची प्रतिक्रिया; गौरी खाननेही खास पोस्ट करत केले कौतुक

दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण; सोशल मीडियावर संताप, एअर इंडिया एक्सप्रेसची कारवाई