ठाणे

दुबईतून आलेल्या कंटेनरमधून अडीच कोटींचे रक्तचंदन केले जप्त

जेएनपीटी बंदरातून दुबईत निर्यात करण्यात आलेल्या मालाच्या कंटेनरबाबत सीमा शुल्क विभागाला संशय होता

वृत्तसंस्था

जेएनपीटीमधून दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटींचे तीन मेट्रीक टन रक्तचंदन जेएनपीटी सीमाशुल्क विभागाच्या सीआययूने जप्त केले आहे.

जेएनपीटी बंदरातून दुबईत निर्यात करण्यात आलेल्या मालाच्या कंटेनरबाबत सीमा शुल्क विभागाला संशय होता. त्यामुळे केंद्रीय गुन्हे पथकाने हा कंटेनर परत मागविला होता. या दुबईतून परत मागविण्यात आलेल्या कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निर्यात करण्यात आलेले सुमारे ३ मेट्रिक टन रक्तचंदन आढळले आहे.

दोन आठवड्यापूर्वी उरण परिसरातील सीएफएस(गोदामातून) अशाच प्रकारे सुमारे ३ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले होते.

या प्रकरणाचा तपास करीत असतांना समोर आलेल्या माहितीवरून सीमा शुल्क विभागाने हा निर्यात झालेला संशयित कंटेनर परत मागविला होता. या कंटेनरमध्ये हे तस्करी करण्यात आलेले रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक