गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा; सावंतवाडी रोड स्थानकावर तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा 
ठाणे

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा; सावंतवाडी रोड स्थानकावर तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा

आगामी गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर, सोयीस्कर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश गणपत म्हस्के यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

Swapnil S

ठाणे : आगामी गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर, सोयीस्कर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश गणपत म्हस्के यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सावंतवाडी रोड (SWV) स्थानकावर तीन महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून जारी करण्यात आली आहे. कोकणातील प्रवासी, पर्यटक आणि चाकरमान्यांची वाढती गर्दी तसेच प्रवासादरम्यान होणारी गैरसोय लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि

खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती.

प्रवाशांना दिलासा

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, दिवा, कल्याण आणि पुणे परिसरातून कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना या विशेष गाड्यांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. अतिरिक्त रेल्वे सेवांमुळे तिकिटांची टंचाई आणि ऐनवेळी होणारी प्रवाशांची धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे. मेमू सेवेमुळे स्थानिक प्रवाशांचीही सोय होणार असून, सावंतवाडी रोड स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना मिळालेल्या थांब्यामुळे सिंधुदुर्ग, सावंतवाडी आणि परिसरातील प्रवासी व पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ठाकरे बंधूंची आज दादरमध्ये विजयी सभा; तरुणांनी भीती घालवली - उद्धव ठाकरे

Mumbai : मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून १३६.१० कोटींचे उत्पन्न

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईत तस्करीपेक्षा अमली पदार्थ सेवनाचे गुन्हे अधिक; ड्रग्जविरोधात पोलिसांचे युद्ध

Mumbai : जन्म दाखल्यासाठी सॉफ्टवेअर आणणार; मानखुर्द, कुर्ल्यातील दाखल्यांचा तत्काळ निपटारा करा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश