ठाणे

दिव्यात पालिकेतर्फे स्वच्छता मोहीम

या मोहिमेअंतर्गत शनिवारी दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानास स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

Swapnil S

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार शनिवारी दिवा प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली. रस्ते साफ करणे, पाण्याने धुणे, पदपथ सफाई, रस्ते दुभाजक स्वच्छ करणे, नालेसफाई मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, लहान-मोठे नालेही स्वच्छ करण्यात येत आहेत. या मोहिमेअंतर्गत शनिवारी दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानास स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबत माजी नगरसेवक शैलेश पाटील, दर्शना म्हात्रे, महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपूरे, तुषार पवार, मनीष जोशी, उपनगर अभियंता विकास ढोले, उपनगर अभियंता कार्यशाळा गुणवंत झांबरे, सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान तसेच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दातीवली तलावाच्या कामाची पाहणी केली. त्या परिसरात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशा सूचना अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिल्या.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली