@ANI
ठाणे

"घरात बसणाऱ्यांना मी..." मुख्यमंत्री शिंदेचा विरोधकांना टोला; हजारो कार्यकर्ते अयोध्येकडे रवाना

आज ठाण्यातून अयोध्येकडे विशेष रेल्वे सोडण्यात आली, यावेळी हजारो कार्यकर्ते राम जन्मभूमीच्या दिशेने निघाले

प्रतिनिधी

९ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. पण त्यांच्याआधी शेकडो शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आज विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन २ दिवसांनी म्हणजेच ९ एप्रिलला अयोध्येमध्ये पोहचणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर टीकादेखील केली. ते म्हणाले की, "माझ्या दौऱ्यामुळे मी सर्वांना कामाला लावले आहे. घरात बसणाऱ्यांना मी बाहेर काढले आहे," असा टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. ठाणे स्थानकातून हजारो कार्यकर्त्ये आज अयोध्येला ट्रेनने निघाले. यावेळी स्वतः मुख्यमंत्री शिंदे आपल्या कार्यकर्त्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात उपस्थित होते. ठाण्याप्रमाणेच नाशिक रेल्वे स्थानकातुनही एक विशेष ट्रेन अयोध्याच्या दिशेला रवाना झाली. यामध्येही हजारो कार्यकर्त्ये रॅम जन्मभूमीच्या दिशेने निघाले आहेत. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "जवळपास ३ हजारांहून अधिक शिवसैनिक, रामभक्त या ट्रेनने अयोध्येत पोहचणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मी स्वतः या कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे."

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत