ठाणे

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

भविष्यात कोणत्याही जाती धर्म, धार्मिक पवित्र ग्रंथ, देवी देवता तसेच महापुरुषांबाबत कोणीही आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडिया साइडवर प्रसारित (व्हायरल) करू नये.

Swapnil S

ठाणे : सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखवणे तसेच चिथावणी देणारी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणाऱ्या इसमांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

'९ ग्रुप दिवा King' या व्हॉट्सॲप ग्रुपवर दि. २२ जानेवारी रोजी डॉ. पप्पू कुमार बोडेराम गौतम या सदस्याने प्रभू श्रीराम यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करून हिंदू धर्मीयांच्या धार्मिक श्रध्दांचा बुद्धीपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करून अपमान केला. म्हणून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी डॉ. पप्पु कुमार बोडेराम गौतम (४३) यांस अटक केली असून आरोपी सध्या मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे न्यायालयीन कोठडीत आहे.

मुंब्रा, संजयनगर परिसरातील इसम नामे असद जाकीर हुसेन रईनने देखील त्याचे मोबाईल फोनमधील इन्स्ट्राग्राम अकाऊंट बाबरी मस्जिदबाबत आक्षेपार्ह इन्स्ट्राग्राम स्टोरी बुद्धीपुरस्सर समाज माध्यमांवर प्रसारीत करून मुस्लीम धर्मीयांमध्ये धार्मिक तेढ वाढविण्यास चिथावणी देणारा मजकुर प्रसारित केला म्हणून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी असद जाकीर हुसेन रईन (४३) यांस अटक अटक केली असून आरोपी सध्या मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे न्यायालयीन कोठडीत आहे. भविष्यात कोणत्याही जाती धर्म, धार्मिक पवित्र ग्रंथ, देवी देवता तसेच महापुरुषांबाबत कोणीही आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडिया साइडवर प्रसारित (व्हायरल) करू नये.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास