ठाणे

खान्देश एक्स्प्रेसला सफाळे रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी

Swapnil S

पालघर : खान्देश एक्स्प्रेसला सफाळे रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी नंदूरबार, धुळे, जळगाव, या जिल्ह्यातील नोकरीनिमित्त स्थानिक नागरिकांनी रेल्वे महा व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे विभागातून खान्देश एक्सप्रेस व एमएमसीटी बीएसएल एसपीएल गाडी नं. १९००३,१९००४ व ०९०५१, ०९०५२ सुरू आहेत. परंतु या गाड्यांना पालघर आणि विरार येथे मध्यरात्रीची वेळ आहे. या वेळेला सफाळा येथून पालघर किंवा विरार जाण्यासाठी व सकाळी पालघर किंवा विरारवरून सफाळा येथे येण्यासाठी प्रवाशांची सोय नाही. त्यामुळे या दोन्ही एक्स्प्रेस ट्रेनला जाताना व येताना २ मिनिटांचा थांबा सफाळे स्टेशनला देण्यात यावा अशी विनंती किशोर चौधरी यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.

सफाळे परिसर बहुतांशी लोक नोकरीनिमित्त खान्देशमधून आलेले आहेत व वास्तव्य करीत आहेत. एमएमसीटी बीएसएल एसपीएल एक्सप्रेस गाडी नं. १९००३,१९००४ व ०९०५१, ०९०५२ ला पकडण्यासाठी मध्यरात्री पालघर किंवा विरार रेल्वे स्टेशन गाठावे लागते.

विरारवरून डहाणूकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११.१५ वाजता असून त्यानंतर सकाळी ५.११ वा. लोकल असून तिथे ६ तासांचा गॅप आहे. त्या दरम्यान पोहोचण्यासाठी एकही ट्रेनची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून खान्देश व मुंबई एक्स्प्रेसला सफाळा येथे थांबा दिल्यास सफाळे परिसरातील लोकांची गैरसोय होणार नसल्याचे किशोर लीलाधर चौधरी यांनी बोलताना सांगितले.

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास