डोंबिवली : २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कल्याण आणि उरणमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस या प्रचार सभेत काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण पूर्व मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराकरिता आज सायंकाळी ६ वाजता कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडीमधील पोटे मैदान येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर प्रचार सभा होणार आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली होती. मंगळवारी होणाऱ्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस हे काय बोलणार याकडे राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेणमध्ये येणार आहेत. परंतु मुख्यमंत्री असताना २००९ शेकापकडून निवडणुकीसाठी उभे असणाऱ्या धैर्यशील पाटील यांच्या प्रचारार्थ रायगड बाजारसमोर झालेल्या सभेत त्यांनी अर्बन बँकेबाबत दिलेले आश्वासन हवेत विरले का? असा सवाल खातेदार व ठेवीदार करीत आहेत. या प्रचार सभेत अर्बन बँकेबाबत काय बोलणार तसेच राजकीय फटकेबाजी काय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पेणमध्ये मंगळवारी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम (नगरपालिका मैदान) येथे महायुतीचे उमदेवार रवी पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेणमध्ये जाहीर सभा घेऊन सुनील तटकरेंसाठी मतदान करण्याचे आवाहन केले होते.