संग्रहित छायाचित्र 
ठाणे

दिवा-वसई रेल्वे चार दिवस रद्द; दिवा-कोपरदरम्यान वाहतूक ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा-वसई रोड दरम्यान गर्डर लॉन्च करण्यासाठी चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दिवा-वसई रोड दरम्यान गर्डर लॉन्च करण्यासाठी चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. १२, १९ आणि २६ जानेवारी रोजी, तसेच २ फेब्रुवारी रोजी रात्री ११.१५ ते पहाटे ५.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. कालावधीत दिवा-वसई रोड रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दिवा आणि वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर गर्डर लॉन्च करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रात्रीच्या वेळी हे ब्लॉक नियोजित केले आहेत. दिवा ते कोपर दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर १२, १९, २६ जानेवारी आणि २ फेब्रुवारी रोजी रात्री ११.१५ ते पहाटे ५.१५ वाजेपर्यंत ६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक ६१००४ दिवा-वसई रोड, गाडी क्रमांक ६१००५ वसई रोड-दिवा, गाडी क्रमांक ६१००६ दिवा-वसई रोड, गाडी क्रमांक ६१००७ वसई रोड- दिवा या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश