डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिराला जमीन; ४ एकर २५ गुंठे जमीन मंदिर ट्रस्टला देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय 
ठाणे

डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिराला जमीन; ४ एकर २५ गुंठे जमीन मंदिर ट्रस्टला देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

डोंबिवली पूर्वेतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री पिंपळेश्वर देवस्थान मंदिराच्या व्यापक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री पिंपळेश्वर देवस्थान मंदिराच्या व्यापक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात देण्याचा आणि सद्यस्थितीतील जमिनीचा वापर नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी यासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

डोंबिवली पूर्वेकडील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर हे परिसरातील प्राचीन आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर परिसर सुमारे चार एकरांमध्ये पसरलेला असून येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराभोवती विकसित करण्यात आलेला बगीचा, नैसर्गिक वातावरण आणि धार्मिक शांतता यामुळे हे ठिकाण भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

गेली अनेक वर्ष या मंदिराच्या जागेचा प्रश्न रखडलेला होता. मंदिर परिसराने व्यापलेली जागा ही अधिकृत होणे आणि ही जागा मंदिराला मिळणे महत्वाचे होते. एमआयडीसीच्या ताब्यात असलेली ही जमीन मंदिर समितीला मिळण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सातत्याने महाराष्ट्र शासन आणि उद्योग विभागाकडे पाठपुरावा केला होता.

मंदिराच्या सौंदर्यीकरणाला मुभा

या जमिनीवर मंदिर ट्रस्टकडून होत असलेला सध्याचा वापर अधिकृतपणे नियमित करण्यालाही सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधांचा विकास आणि त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल