डोंबिवलीकरांचा प्रवास होणार सुखकर व वेगवान; डोंबिवली ते ठाणे जलमार्गावर लवकरच धावणार ई-वॉटर टॅक्सी प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

डोंबिवलीकरांचा प्रवास होणार सुखकर व वेगवान; डोंबिवली ते ठाणे जलमार्गावर लवकरच धावणार ई-वॉटर टॅक्सी

रेल्वेची जीवघेणी गर्दी आणि रस्त्यांवरील तासनतास होणाऱ्या वाहतूककोंडीतून डोंबिवलीकरांची लवकरच सुटका होणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईच्या धर्तीवर डोंबिवलीतही लवकरच ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Swapnil S

डोंबिवली : रेल्वेची जीवघेणी गर्दी आणि रस्त्यांवरील तासनतास होणाऱ्या वाहतूककोंडीतून डोंबिवलीकरांची लवकरच सुटका होणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईच्या धर्तीवर डोंबिवलीतही लवकरच ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली.

मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान जलद प्रवासासाठी ई-वॉटर टॅक्सी ही सेवा अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. याच धर्तीवर डोंबिवलीतही ही सेवा सुरू करण्यासाठी मंत्री नितेश राणे आणि स्वीडनचे महावाणिज्यदूत स्वेन ओस्टबर्ग यांच्यात मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली असून त्यात या प्रकल्पावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

मोठा गाव जेट्टीचे ७० टक्के काम पूर्ण

डोंबिवलीहून सुरू होणारी ही ई-वॉटर टॅक्सी डोंबिवली ते ठाणे, मीरा-भाईंदर तसेच डोंबिवली, दिवा, ठाणे ते थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अशा मार्गांवर धावणार आहे. या प्रकल्पासाठी डोंबिवलीतील मोठा गाव जेटीचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे. ही जलवाहतूक सेवा लवकरच प्रवाशांसाठी खुली केली जाणार असून या प्रवासाच्या तिकीट दराबाबतचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...