Instagram
ठाणे

कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांची हॅटट्रिक

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यावर दोन लाखांपेक्षा जास्त मतांची आघाडी घेऊन विजयश्रीवर शिक्कामोर्तब केले.

Swapnil S

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीची मतमोजणीला मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रारंभ झाला होता. शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ठाकरे गट तथा महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांच्याबरोबरच्या लढतीत पहिल्या फेरीपासूनच दहा हजारांवर मताधिक्य घेत मताची आघाडी कायम ठेवली होती. असेच मतांच्या घोडदौडीमध्ये त्यांचे सातत्य राखून होते. अखेर सोळाव्या फेरीत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यावर दोन लाखांपेक्षा जास्त मतांची आघाडी घेऊन विजयश्रीवर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, या विषयीची उद्घोषणा संत सावळाराम महाराज क्रीडासंकुल परिसरात होताच शिवसेना तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून भगवे झेंडे फडकवित आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. यामध्ये शिवसेना, भाजप, मनसे, रिपाइं आदी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. संकुलाबाहेर घरडा सर्कल येथे ढोल-ताशांच्या गजरात सर्वजण बेभान होऊन नाचत होते. या आनंदोत्सवात महिलांचाही सहभाग मोठा होता. गुलाल उधळून सर्व रस्ता लालेलाल झाला होता.

विजयी आघाडी मिळविल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे डोंबिवलीत संत सावळाराम महाराज संकुलातील मतमोजणी केंद्राच्या बाहेर आगमन होताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गराडा घातला आणि त्यांच्याबरोबर नाच-गाण्यात ठेका धरला. डॉ. शिंदे हे या आनंदोत्सवात सामील झाले तेव्हा पत्रकारांच्या कॅमेऱ्यात हे सर्व आनंदी क्षण कैद झाले. त्यानंतर पुन्हा कार्यकर्ते व शिवसैनिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा केला.

त्यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतमोजणी केंद्रात येऊन मतमोजणीचे काम करण्यासाठी सज्ज असलेल्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेतली. तसेच त्यांनी निवडणू मीडिया सेंटर कक्षातील पत्रकारांची भेट घेत. हा विजय सर्वांच्या मेहनतीने मिळाला आहे, असे सांगितले. महायुतीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टामुळे ही हॅटट्रिक झाली आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश