ठाणे

ठाण्यात माघी गणेशोत्सवाचा उत्साह; घरगुती गणपतींच्या संख्येत वाढ

Swapnil S

ठाणे : माघी गणेशोत्सवाची ठाण्यात लगबग सुरू झाली असून शहरात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. यावर्षी माघी गणेश जयंतीला म्हणजे १३ फेब्रुवारीला ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये १९२५ श्रींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये सर्वाधिक १,७७६ श्री मूर्तींची स्थापना घरी होणार असून १४९ सार्वजनिक मडळेही श्रींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत.

यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीतिथी सोमवारी १२ फेब्रुवारीला सायंकाळी पावणेपाच वाजता सुरू होणार असून मंगळवारी १३ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून ४१ मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी विनायक चतुर्थी असल्याने त्याच दिवशी गणेश जयंती साजरी होणार आहे. त्यामुळे गणपती मुर्तींच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी ११ वाजून ४० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपर्यंत असणार आहे. अवघ्या दोन ते तीन तासांमध्ये श्रींची स्थापना होणार असल्याने आणि अनेकजण त्याच दिवशी सत्यनारायण पूजाही करणार असल्याने भटजींपासून देखावा, पूजेच्या साहित्याची जुळवाजुळव करण्यात चाकरमानी व्यस्त झाले आहेत.

कल्याण परिमंडळातील सार्वजनिक गणपती

यावर्षीही घरी स्थापन होणाऱ्या १७७६ पैकी १२१९ बाप्पा दीड दिवस पाहुणचार घेणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षी लोकसभा निवडणुकीची धामधुम आहे. त्यामुळे अनेक गणेश मंडळांना राजकीय पक्षांकडूनही देणग्या मिळाल्या असल्याने शहरात अनेक ठिकाणी भव्य मंडप, मंदिरांची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. आयुक्तालय परिसरात यावर्षी १४९ ठिकाणी सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा होत आहे. यामध्ये सर्वाधिक अधिक सार्वजनिक ६६ गणपती कल्याण परिमंडळात आहेत.

शहर/विभाग

ठाणे ३३६२२

भिवंडी ६९३६

कल्याण ३२३६६

उल्हासनगर २५९२६

वागळे १६५२९

घरगुती - सार्वजनिक

दीड दिवस १२१९३७

पाच दिवस ३९८७८

सहा दिवस १९०७

सात दिवस ११०२६

१० दिवस ३९०६

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस