ANI
ठाणे

माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मीनाक्षी शिंदे या शिवसेनेच्या महापौर होत्या तसेच त्या ठाणे महापालिकेत चार वेळा नगरसेवकपदी निवडणूक आल्या आहेत

प्रमोद खरात

ठाणे : एकनाथ शिंदे यांना उघडपणे समर्थन देणारे शिवसेना जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांची शिवसेनेतून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली असताना मंगळवारी शिंदे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या माजी महापौर आणि ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांचीही पक्षविरोधी कारवाया केल्या प्रकरणी शिवसेनेतून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. मीनाक्षी शिंदे या शिवसेनेच्या महापौर होत्या तसेच त्या ठाणे महापालिकेत चार वेळा नगरसेवकपदी निवडणूक आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ त्याच्या बंगल्यासमोर तसेच जांभळीनाक्यावर आनंद दिघे आश्रमासमोर शिंदे समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते, त्यात नरेश म्हस्के यांच्यासह मीनाक्षी शिंदे सहभागी झाल्या होत्या. मंगळवारी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी एक पत्रक काढले असून त्या द्वारे त्यांनी मीनाक्षी शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश