ठाणे

सावत्र बापाने केली चार वर्षीय मुलाची हत्या; पोलिसांनी घातल्या बेड्या

आर्यन असे मृत मुलाचे नाव असून या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी सावत्र पित्याला अटक करण्यात आली आहे.

Swapnil S

ठाणे : नकोशा झालेल्या चार वर्षीय मुलाची मोहम्मद दिलशान इम्रान या सावत्र बापाने गळा आवळून मारहाण करीत हत्या केल्याची धक्कादायक घटना मानपाडा येथील एमएमआरडीएच्या दोस्ती इमारतीत घडली. आर्यन असे मृत मुलाचे नाव असून या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी सावत्र पित्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी मंगळवारी दिली.

घोडबंदर रोड परिसरातील दोस्ती एम्पेरियाजवळ असणाऱ्या एमएमआरडीए इमरतीमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय दिलशान इम्रान याने रेश्मा नावाच्या महीलेबरोबर लग्न केले होते. रेश्माचे हे दुसरे लग्न होते. तिला पहिल्या पतीपासून आर्यन नावाचा चार वर्षांचा मुलगा असल्याचे तिने दिलशानपासून लपवले होते. कालांतराने रेशमा आर्यनला घेऊन दिलशान आणि ती राहत असलेल्या घरी आली. मात्र या घटनेचा दिलशान याला प्रचंड राग आला. त्यामुळे तो आर्यनचा राग राग करू लागला. याच रागातून त्याने २८ जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याचा सुमारास आर्यनचा गळा आवळून त्याला लोखंडी सोफ्यावर आपटले. यामध्ये दुखापत होऊन आर्यनचा मृत्यू ओढवला.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता