ठाणे

रायगडच्या पालकमंत्र्यांवरून शिंदे गटात धुसफूस!

प्रतिनिधी

राज्यात शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून मंत्रिमंडळ विस्तारापासून पालकमंत्री नियुक्त पर्यंत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. आता रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री उदय सामंत यांच्या नियुक्तीवरून अंतर्गत धुसफूस वाढली आहे. महाविकास आघाडी सरकार मधील पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदलण्यासाठी शिवसेनेच्या रायगडमधील तीन आमदारांनी केलेली खटपट शिंदे सरकारमध्ये देखील वाया गेल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. शिवसेनेमध्ये दोन गट पडण्याची कुनकुन रायगडमधुनच लागली होती. जास्त आमदार असल्यामुळे रायगडचा पालकमंत्री शिंदे गटाचा होईल, अशी आपेक्षा आमदारांसह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनाही होती; मात्र तसे न झाल्याने शिंदे गटामध्ये अंतर्गत वाद आता वाढल्याने जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. स्थानिक पालकमंत्री नेमावा, अशी मागणी देखील सुरू झाली असून लवकरच मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आघाडी सरकारच्या काळात रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी निवड झाली. दरम्यान, पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीचे परस्पर निर्णय घेतात. निधी वाटपातही शिवसेना आमदारांना डावलण्यात येत आहे, शिवसेनेचे आमदार जिल्ह्यात जास्त असूनही पालकमंत्री पद शिवसेनेला का ? असे आरोप महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, खालापुरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी करत पालकमंत्री हटावचा नारा दिला होता. मुख्यमंत्र्यांनी सबुरीचा सल्ला दिल्यानंतरही तटकरे आणि शिवसेना आमदारांमध्ये वाद विकोपाला गेला होता. अखेर अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारमध्ये रायगडच्या स्थानिक आमदारांना पालकमंत्री पदासाठी संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यात भरत गोगावले यांच्या नावाचा प्रामुख्याने विचार होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शिंदे गटातील अंतर्गत वादामुळे केवळ ११ मंत्र्यांनी शपथ घेतली. भरत गोगावले यांना देखील मंत्रीपदा अभावी वंचित राहावे लागले. अशातच अखेरच्या क्षणी शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्या उदय सामंत यांना उद्योग मंत्री पदासह रायगडचे पालकमंत्री केले.

ज्यांना जिल्ह्याची माहिती नाही ते पालकमंत्री

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून उदय सामंत फिरकेलेले नाहीत. पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. परिणामी गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्याला सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. पेणपर्यंत याची झळ पोहचली आहे. अजून पालकमंत्री सामंत इकडे फिरकलेले नाहीत. स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उत्तर देत नाहीत. आदिती तटकरे यापूर्वी पालकमंत्री होत्या. जिल्ह्यावर कोणतीही आपत्ती ओढल्यास स्वतः भेट देऊन, आढावा घ्यायच्या. तात्काळ तोडगा काढत होत्या. सध्या पालकमंत्री भूमिगत झाले

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!

IPL 2024: चेन्नईची प्ले-ऑफसाठी झुंज,बेभरवशी पंजाब किंग्जविरुद्ध आज लढत!

ATMमधून फाटलेल्या नोटा बाहेर आल्यास काय करायचं? काय सांगतो RBIचा नियम