ठाणे

....अखेर गडकरी रंगायतनची तिसरी घंटा वाजणार; जूनच्या पहिल्या आठवड्यात पडदा उघडणार, तब्बल १८ वर्षांनी नूतनीकरण

नाट्य रसिकांना उत्कंठा लागून राहिलेल्या ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनचा पडदा अखेर जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उघडणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

Swapnil S

ठाणे : नाट्य रसिकांना उत्कंठा लागून राहिलेल्या ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनचा पडदा अखेर जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उघडणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

यापूर्वी गडकरी रंगायतनचे काम हे १ मे रोजी पूर्ण होणार होते. त्यानंतर १५ मे तारीख आली होती. परंतु आता बाहेरील आणि आतील काही किरकोळ कामे शिल्लक राहिल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात गडकरी रंगायतनाचा पडदा उघडला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ठाण्याची चौपाटी असलेल्या मासुंदा तलावाच्या काटावर १९७८ मध्ये राम गणेश गडकरी रंगायतन बांधण्यात आले होते. तसेच रंगायतनची २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती केली गेली. त्यानंतर आता म्हणजे २०२४- २५ मध्ये तब्बल १८ वर्षांनी नूतनीकरण केले जात आहे. रंगायतनची आसन क्षमता १ हजार ८० एवढी आहे. पूर्वी आखूड खुर्च्या होत्या, त्यामुळे बसण्यासही रसिकांना त्रास होत होता. हाच मुद्दा लक्षात घेऊन आता येथे आरामदायी खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत.

रंगायतनाच्या पुष्ठभागावरील नवीन रंग छटा देण्याचे काम सुरू झाले असून आता ते देखील अंतिम टप्यात आले आहे. तर आतील बाजूस वातानुकूलित यंत्रणेचे भाग हा स्टेजवर येत असल्याने तो हलविण्यात आला आहे. तसेच इतर किरकोळ कामे शिल्लक असून कलाकारांच्या नजरेतून ही कामे केली जात आहेत.

गडकरी रंगायतनमधील बदल

गडकरी रंगायतनमधील सुधारणा करताना रंगायतनचे पारंपरिकपण जपले जाणार आहे. काळानुरूप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यानुसार आता आरामदायी खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच त्यामुळे आसन क्षमता १२० ने कमी झाली असून ती आता ९६० पर्यंत आलेली आहे. ज्येष्ठ रसिकांना ज्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या, त्या आता चढाव्या लागणार नाहीत. त्या ज्येष्ठ रसिकांसाठी पारदर्शक पद्धतीचे कॅप्सुल लिफ्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच खालील बाजूस आणखी दोन टॉयलेट वाढविण्यात आले. त्याचबरोबर अत्याधुनिक स्वरूपाचे स्पीकर बसविले जाणार आहेत. याशिवाय खिडक्यांची संख्या वाढवून ती संख्या ६ वर नेण्यात आली आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video