ठाणे

अडीच कोटीचे हस्तिदंताची विक्री करण्यासाठी आलेले गजाआड; ठाणे गुन्हे शाखा युनिटची कामगिरी

वनविभागाच्या मदतीने सापाला रचून कळवा नाका परिसरातून दोघं संशयितांना अटक केली.

प्रतिनिधी

वन्यप्राणी हत्तीच्या दातांची चोरटी विक्री करण्यासाठी कळवा परिसरात दोन संशयित येत असल्याची खबर ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने वनविभागाच्या मदतीने सापाला रचून कळवा नाका परिसरातून दोघं संशयितांना अटक केली. त्यांच्याकडे अंगझडतीत अडीच कोटीचे हस्तिदंत आढळले. दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हस्तीदंताची विक्री करण्याकरीता कळवा परिसरात येणार असल्याची माहीती प्राप्त झाल्याने गुन्हे शाखा, घटक १ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारने दिलेल्या माहीतीच्या अनुषंगाने वनविभागाचे मदतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवसेना शाखेसमोर, कळवा नाका, ठाणे येथे सापळा रचून दोन इसमांस ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत वन्यजीव प्राणी हत्ती याचे सुमारे ३४.५ से. मी. लांबीचे व १.४०० कि.ग्रॅम वजनाचे एक हस्तीदंत हस्तगत केले गुन्हे शाखा आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याची बाजारात अडीच कोटीची किंमत असल्याचे सांगितले.

दरम्यान, हे हस्तिदंत कोठून आणले? कुणाला विक्री करणार होते, याबाबतचा खुलासा चौकशीअंती होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी दिली.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन