ठाणे

गणेशोत्सवात रेल्वे स्थानकांवर ‘गणेश पंचरत्न’ प्रसारित करावे

भक्तिमय वातावरणात रेल्वे प्रशासनानेही सर्व रेल्वे स्थानकांवरील ध्वनिक्षेपण यंत्रणेवर श्री गणेशाच्या प्रार्थना, श्लोक आणि गाणी प्रसारित करावीत, असे आवाहन ठाण्याचे खा. नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केले आहे.

Swapnil S

ठाणे : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असून यानिमित्ताने सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण असते. या भक्तिमय वातावरणात रेल्वे प्रशासनानेही सर्व रेल्वे स्थानकांवरील ध्वनिक्षेपण यंत्रणेवर श्री गणेशाच्या प्रार्थना, श्लोक आणि गाणी प्रसारित करावीत, असे आवाहन ठाण्याचे खा. नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केले आहे.

श्री गणेशाची महती वर्णन करणारे अनेक श्लोक, काव्य आणि गाणी अनेक आहेत आदी शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ त्यापैकी एक, ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी नुकतेच लंडन येथील हाऊस ऑफ कॉमनमध्ये देखील हे स्तुती काव्य गायले. त्याची ध्वनिफित रेल्वे प्रशासनाला प्रसारणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी