ठाणे

ठाण्यात दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणार

ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील तीनहात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्त्वावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा कार्यन्वित करण्यात येणार असल्याची मााहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.

Swapnil S

ठाणे : वाहनांच्या वर्दळीमुळे दिव्यांग आणि दृष्टिहीनांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. वाहतूक सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील तीनहात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्त्वावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा कार्यन्वित करण्यात येणार असल्याची मााहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.

ठाण्यात तीनहात नाका, नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन, कापूरबावडी-माजिवडा अशा मुख्य चौकात एकाचवेळी अनेक रस्त्यांवर वाहने येतात.

दृष्टिहीन दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांडताना अडचणी येतात. त्यामुळे दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तीनहात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्त्वावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे. यात रेल्वेच्या दिव्यांग डब्याच्या धर्तीवर बीपर असणार असून जिथे चढ-उतार असतील तिथे छोटे-छोटे रॅम्प केलेले असून तेथील पोलवर हे बीपर असणार आहेत.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी