ठाणे

अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केडीएमसी क्षेत्रात 'हर घर तिरंगा'उपक्रम

वृत्तसंस्था

१५ ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकावून उत्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलतांना केले. केडीएमसी क्षेत्रात २ लाख १० हजार तिरंगा फडकविण्याचा मानस पालिका आयुक्तांनी व्यक्त केला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, महापालिका सचिव संजय जाधव उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारतींवर तसेच नागरिकांनी देखील स्वयंस्फुर्तीने स्वत:च्या घरावर,ध्वज संहितेचे पालन करुन राष्ट्रध्वज उभारणे अपेक्षित असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी ‍उस्फुर्त प्रतिसाद दयावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासनाकडून २ लाख १० हजार झेंडयांची मागणी आता करण्यात आलेली आहे. झेंडे सशुल्क किंमतीत प्रत्येक प्रभागात महापालिकेचे विक्री केंद्र असेल, महापालिकेमार्फत बुथ लेव्हल स्वंयसेवकांची नियुक्ती झेंडे वितरणासाठी करण्यात येत आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण