संग्रहित छायाचित्र
ठाणे

गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे - सुप्रिया सुळे

Swapnil S

बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. हे अतिशय गंभीर आणि संतापजनक आहे. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरीक करीत आहेत. नागरिकांचा रोष अतिशय योग्य असून गृहखात्याने त्यांच्या संतापाची दखल घेण्याची गरज आहे. पोलिसांनी या व्यक्तीची सखोल चौकशी करून त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. याशिवाय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.

तसेच या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. “अशा नराधमांना लोकांसमोर फाशीची शिक्षा द्या, ही एकदम घाणेरडी विकृती आहे. यामध्ये मला राजकारण आणायचे नाही, हा एक सामाजिक विषय आहे. आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. अशा विकृत लोकांना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, त्यांना असे वागण्याची भीती वाटली पाहिजे. कुठल्या महिलेकडे पाहताना धडकी भरली पाहिजे. हात लावणे तर दूरची गोष्ट, पण पाहतानादेखील दहा वेळा विचार केला पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा