ठाणे

पेण तालुक्यात श्री सदस्यांनी केले १५ टन निर्माल्य गोळा

आरोग्य तपासणी शिबीर, प्रौढ साक्षरता वर्ग, तलावातील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण आदी विविध सामाजिक कार्य केले जात आहेत.

वृत्तसंस्था

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने पेण शहरासह पेण तालुक्यातील गणेश विसर्जन ठिकाणाहून १५ टन निर्माल्य गोळा करण्यात आले असून या निर्माल्य पासून खत निर्मिती केली जाणार आहे.

रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण व संगोपन, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबीर, प्रौढ साक्षरता वर्ग, तलावातील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण आदी विविध सामाजिक कार्य केले जात आहेत. या बरोबरच गणेश विसर्जन वेळी निर्माल्य तलाव अथवा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे होत असलेल्या पाणी प्रदूषण टाळण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने गणेश विसर्जन वेळी निर्माल्य गोळा करुन त्याच्यापासून खत निर्मिती करण्याचा उपक्रम देखील मागील काही वर्षांपासून हाती घेण्यात आला आहे.

या वर्षी पेण शहरातून दीड दिवसांचे ९१६ ,पाच दिवसांचे ९९३, तर अनंत चतुर्दशी दिवशी २१७ तसेच १६१ गौरींचे विसर्जन आले. पेण तालुक्यातील ग्रामीण भागात दीड दिवसांचे १८५४ , पाच दिवसांचे ४१९८, अनंत चतुर्दशी ला ७९१ अशा एकूण ८९७९ गणेशमूर्तींचे तसेच १०१० गौरींचे विसर्जन करण्यात आले.

यावेळी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडाच्या सदस्यांनी पेण शहरातून ४ टन व ग्रामीण भागांतून ११ असे एकूण १५ टन निर्माल्य गोळा करण्यात आले. या साठी पेण शहरांतील २१५ तर पेण तालुक्यातील वाशी नाका, वाशी, रावे, वरवणे, वरसई, सापोली, धावटे, आंबिवली, जिते, हनुमान पाडा, दादर, शिर्की, वडखळ, भाल या बैठकांतील गावाच्या अंतर्गत येणारे बैठकांतील १३४७ असे एकूण १५६२ ‘श्री सदस्य’ सहभागी झाले होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी