ठाणे

वाढत्या उष्णतेमुळे थंडपेयांच्या मागणीत वाढ; शरीराला थंडावा देण्यासाठी नागरिकांकडून थंड पेयांना अधिक पसंती

तळा बाजारपेठेत संत्री ज्यूस, मोसंबी, अननस, लिंबू सरबत, अननस ज्यूस, कोकम सरबत, उसाचा रस यांसारखे विविध थंडपेये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या थंड पेयांच्या किमतीत वाढ झाली असून वाढलेल्या महागाईचा फटका थंड पेयांना देखील बसला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Swapnil S

श्रीकांत नांदगावकर/ तळा

वाढत्या उष्णतेमुळे तळा बाजारपेठेत थंडपेयांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून उष्णतेमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी नागरिकांची पावले वळली आपसुकच थंड पेयांकडे वळली आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचे प्रमाण वाढले असल्याने या उष्णतेपासून वाचण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांची पावले थंडपेयांच्या दुकानांकडे वळली आहेत. उन्हातून काम करताना थकलेल्या शरीराला थंडावा देण्यासाठी नागरिकांकडून थंड पेयांना पसंती मिळत आहे. यासाठी तळा बाजारपेठेत संत्री ज्यूस, मोसंबी, अननस, लिंबू सरबत, अननस ज्यूस, कोकम सरबत, उसाचा रस यांसारखे विविध थंडपेये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या थंड पेयांच्या किमतीत वाढ झाली असून वाढलेल्या महागाईचा फटका थंड पेयांना देखील बसला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ज्यूसच्या किमतीत वाढ झाली आहे. लिंबूचे दर खूप वाढल्यामुळे लिंबू सरबतही महागला आहे. तसेच सफरचंद, मोसंबी, संत्री, अननस या फळांच्या वाढलेल्या किमतींमुळे त्यांच्या ज्यूसचे दर देखील वाढले आहेत.साधारणपणे १० ते १५ रुपयांची वाढ प्रत्येक ज्यूसच्या ग्लासमध्ये झालेली आहे. (दत्ता साळुंखे ज्यूस विक्रेते)

फळांच्या किमतीचा फटका ज्यूसला

ज्यूसच्या वाढलेल्या किमतीचे प्रमुख कारण म्हणजे फळांचे वाढलेले दर आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फळांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. ज्यामध्ये १६० रु. प्रतिकिलो मिळणारे सफरचंद आता २०० रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत आहेत. पूर्वी ६० रुपये किलो मिळणारे अननस आता १०० ते १२० रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत आहे. यांसह संत्री व मोसंबीच्या दरातही वाढ झाली असून ९० रुपये प्रति किलो मिळणारे संत्री व मोसंबी आता १२० रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत आहेत. फळांच्या या वाढलेल्या दरामुळे बाजारपेठेत ज्यूसच्या किमतीही वाढल्या आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी