ठाणे

श्रीराम ही काय त्यांची खासगी मालमत्ता आहे का?  उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात

राम मंदिराचे निर्माण होत आहे. मोठ्या आनंदाची आणि गर्वाची बाब आहे. ९२ च्या दंगलीत हिंदू लोकांना वाचविण्याचे काम शिवसेनेने केले आहे

Swapnil S

भाईंदर : निवडणुकीत मत दिले,तर श्रीरामाचे दर्शन मोफत करणार असे सांगणारे जिकडे निवडणूक तिकडच्या लोकांना  मध्यप्रदेशच्या निवडणुकीत खास करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, आपण जर आम्हाला मतदान केले, तर आम्ही तुम्हाला रामलल्लाचे दर्शन मोफत करणार, श्रीराम ही काय त्यांची खासगी मालमत्ता आहे का ?  रामलल्लाचे दर्शन मोफत करा, मग महाराष्ट्रात राहणाऱ्या हिंदूंना फ्रीमध्ये श्रीराम दर्शन का नाही? जिथे निवडणुका तिथेच फक्त मोफत राम दर्शन हेच का तुमचे हिंदुत्व? जर तुम्हाला मत दिले नाही, असे हिंदू म्हणाले तर त्यांना श्रीरामाचे दर्शन करू देणार नाही का? असे सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत केले. मीरा- भाईंदर यादव समाज सेवा संस्था चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गोवर्धन पूजा कार्यक्रमाला ठाकरे रविवारी रात्री उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

हजारो वर्षांपासून जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय बजरंगबली म्हटले जातेय. हे काल नाही आले, तर हिंदूंना शिकवायला लागले आहेत. 'हृदयात राम आणि हाताला काम' असे शिवसेनेचे हिंदुत्व आहे. जो या देशाला आपले मानतो, जो देश लढतो तो आपला असे बाळासाहेबांनी सांगितलेले हिंदुत्व आहे. अलीकडेच प्रधानमंत्री यांनी मुंबईत सगळे रोजगार गुजरात मध्ये नेले आणि गुजरात मजबूत होणार तर देश मजबूत होणार आहे असे बोलले; मात्र उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र मोठा झाला, तर देश मोठा होणार नाही का? देशात अन्य राज्य नाहीत का? गुजरातचा विकास झाला पाहिजे त्याबद्दल आनंद आहे पण महाराष्ट्राचे ओरबाडून कशाला नेता? असे प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केले.

राम मंदिराचे निर्माण होत आहे. मोठ्या आनंदाची आणि गर्वाची बाब आहे. ९२ च्या दंगलीत हिंदू लोकांना वाचविण्याचे काम शिवसेनेने केले आहे. त्याकाळी भाजपची तर गोष्टच सोडा कारण जेव्हा मुंबई जळत होती तेंव्हा एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून लोकांचे रक्षण करण्याचे काम केले आहे.

खासदार राजन विचारे, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर, धनेश पाटील, लक्ष्मण जंगम, माजी नगरसेविका तारा घरत, युवासेनेचे पवन घरात, यादव समाज सेवा संस्थेचे कार्यकारणी अध्यक्ष रंग बहादूर यादव, अध्यक्ष उमेश यादव, सचिव आर.बी. यादव हे उपस्थित होते.

समृद्वी महामार्गावरून प्रवास करताय? आजपासून ५ दिवस 'ब्लॉक'; कुठे आणि किती वेळासाठी रोखणार वाहतूक?

भांडण सोडवल्याची 'शिक्षा'; ४५ दिवस तुरूंगवास भोगल्याचा दावा, म्हणाला - “मैं सेंट्रल जेल से गोरा होकर आया”! तरुणाचा VIDEO व्हायरल

महिलेने मध्यरात्री ऑर्डर केलं उंदीर मारण्याचं औषध; Delivery Boy ला आला आत्महत्येचा संशय, मग जे घडलं...

Thane : घोडबंदर घाटात उतरणीवर कंटेनरच्या धडकेमुळे विचित्र अपघात; अनेक वाहने एकमेकांवर आदळली, चालक फरार - Video

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक CORS स्टेशन उभारणार; भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार, जाणून घ्या सविस्तर