ठाणे

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलात प्रथमच महिला कर्मचारी कार्यरत

वृत्तसंस्था

बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलात प्रथमच बाहय यंत्रणेद्वारे १५ महिला अग्निशामक कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आल्या असून या १५ अग्निशामक महिला कर्मचारी आता आपत्ती काळात नागरिकांच्या मदतीसाठी इतर अग्निशमन अधिकाऱी / कर्मचारी यांच्या समवेत सज्ज राहणार आहेत.

या अग्निशामक महिला कर्मचारी सदयस्थितीत टिटवाळा, आधारवाडी, कल्याण (प), डोंबिवली (प) येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत राहणार आहेत. विविध आपत्तीचे प्रसंगी नागरिकांना प्राधान्याने मदत करण्यात महापालिकेचे अग्निशमन पथक नेहमीच अग्रेसर असते. यामध्ये आता महिलांना देखील अग्निशामक या पदावर कार्यरत ठेऊन महापालिकेने महिलांप्रती प्रगतीचे नवे दालन खुले केले आहे.

महापालिकेची आधारवाडी कल्याण पश्चिम, टिटवाळा पूर्व, कल्याण पूर्व, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम या पाच ठिकाणी अग्निशमन केंद्र कार्यरत असून आता डोंबिवलीतील पलावा परिसरातही अग्निशमन विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्र पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे.

या अग्निशमन केंद्राचा फायदा आपत्तीचे वेळी नजीकचा ग्रामीण परिसर, २७ गावे यांना होईल, अशी माहिती महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली आहे.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?