कल्याण-कसारा तिसरा-चौथा रेल्वे मार्ग प्रकल्प गतिमान; उल्हासनगरमध्ये भूसंपादन मोजणी पूर्ण 
ठाणे

कल्याण-कसारा तिसरा-चौथा रेल्वे मार्ग प्रकल्प गतिमान; उल्हासनगरमध्ये भूसंपादन मोजणी पूर्ण

कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या नवीन रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक भूसंपादन व बाधित क्षेत्र मोजणीची महत्त्वपूर्ण प्रक्रिया उल्हासनगरात पूर्ण झाली. ठाणे जिल्हाधिकारी यांच्या सूचनांनुसार आणि उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांच्या समन्वयातून ही तांत्रिक मोजणी वेगाने आणि अचूकपणे राबविण्यात आली.

Swapnil S

उल्हासनगर: कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या नवीन रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक भूसंपादन व बाधित क्षेत्र मोजणीची महत्त्वपूर्ण प्रक्रिया उल्हासनगरात पूर्ण झाली. ठाणे जिल्हाधिकारी यांच्या सूचनांनुसार आणि उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांच्या समन्वयातून ही तांत्रिक मोजणी वेगाने आणि अचूकपणे राबविण्यात आली. महापालिका, नगरभूमापन आणि नगररचना विभागाच्या एकत्रित सक्रियतेमुळे रेल्वे प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सरकारतर्फे पायाभूत सुविधा वृद्धी व रेल्वेसेवा विस्ताराच्या ध्येयातून तिसऱ्या-चौथ्या रेल्वेमार्गाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी आवश्यक असलेली अचूक जमीनमोजणी, बाधित क्षेत्राचा नकाशा आणि पंचनामा तयार करण्याचे सर्वेक्षण २८ नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्यात आले. १३ नोव्हेंबरला ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार ही महत्त्वपूर्ण टप्याची अंमलबजावणी करण्यात आली.

या सर्वेक्षण मोहिमेत नगर भूमापन कार्यालयातील गीता पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नगररचना विभागातून पॅनलवरील सर्वेअर दत्ता भोईर यांनी तांत्रिक सहाय्य केले, तर महापालिका मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त अजय साबळे, मालमत्ता व्यवस्थापक छाया डांगळे, कनिष्ठ अभियंता सुमित मुकादम आणि इतर कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहिले.

कल्याण-कसारा रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या नवीन रेल्वेमार्गाचा प्रकल्प हा विभागाच्या भविष्यातील वाहतूक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्प्पा आहे. आज पूर्ण झालेली मोजणी व रेखांकन प्रक्रिया ही त्या दिशेने झालेले निर्णायक पाऊल आहे. सर्व विभागांनी उत्कृष्ट समन्वय राखत पारदर्शक व काटेकोरपणे कार्य केले आहे. नागरिकांच्या हिताचे रक्षण व शाश्वत विकास हा आमचा केंद्रबिंदू असून पुढील टप्प्यांमध्येही प्रशासन तितक्याच वेगाने आणि दक्षतेने काम करणार आहे.
मनिषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका

बदलीच्या तक्रारीसाठी पोलिसांना कार्यालयात आणणे गैरवर्तन; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण! ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम, पुढील ४८ तास महत्त्वाचे

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार