ठाणे

कल्याणमध्ये दोन गावठी पिस्तुले अन् दहा काडतुसे जप्त; दोघे अटकेत

कल्याणजवळील बल्याणी परिसरात चारचाकी वाहनाची तपासणी करताना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी पिस्तुले आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली.

Swapnil S

कल्याण : कल्याणजवळील बल्याणी परिसरात चारचाकी वाहनाची तपासणी करताना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी पिस्तुले आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी रोशन गोंधळी आणि त्याचा साथीदार कृष्णा यादव या दोघांना अटक करण्यात आली आहे.

ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वाहनाची झडती घेतल्यानंतर शस्त्रे व काडतुसे आढळून आली. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ही शस्त्रे कशासाठी आणली होती, ती कोणाकडून घेतली आणि कोणता गुन्हा करण्याचा हेतू होता, याचा तपास पोलीस अधिकारी विशाल चोरगे करीत आहेत. रोशन गोंधळीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार