पुणेरी पाटी टाईप संदेशाने सर्वांचीच करमणूक; अख्ख्या बिल्डिंगचे मत केवळ यांनाच  
ठाणे

KDMC Election : पुणेरी पाटी टाईप संदेशाने सर्वांचीच करमणूक; अख्ख्या बिल्डिंगचे मत केवळ यांनाच

कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध उमेदवारांच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, कल्याण पूर्वेत एका घराबाहेर लागलेल्या ‘पुणेरी टाईप’ पाटीने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पाटीवरील मजकूर इतका स्पष्ट, तिरकस आणि थेट आहे की, काही राजकीय उमेदवारांचा हिरमोड झाला असताना काहींच्या मात्र चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

Swapnil S

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध उमेदवारांच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, कल्याण पूर्वेत एका घराबाहेर लागलेल्या ‘पुणेरी टाईप’ पाटीने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पाटीवरील मजकूर इतका स्पष्ट, तिरकस आणि थेट आहे की, काही राजकीय उमेदवारांचा हिरमोड झाला असताना काहींच्या मात्र चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

पुणेरी पाट्यांची खासियत म्हणजे - कोणताही मुलाहिजा न बाळगता नेमक्या शब्दांत दिलेला संदेश. फेरीवाले असोत, पत्ता विचारणारे असोत किंवा कुणीही अनावश्यक त्रास देणारे असोत, पुणेरी पाट्या आपले काम चोखपणे बजावतात. हाच पुणेरी बाणा आता थेट राजकारणात उतरल्याचे चित्र कल्याण पूर्वेत पाहायला मिळत आहे.

कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक १२ मधील एका इमारतीतील घराबाहेर ही पाटी लावण्यात आली आहे. या पाटीवर लिहिले आहे - “दारावरची बेल वाजवून त्रास देऊ नका‘ ‘आमच्या घरातलेच नाही, तर अख्ख्या बिल्डिंगचे वोट फक्त ‘Sachin Pote’ यांनाच!”

इतक्यावरच न थांबता, पाटीवर शिवसेनेची निवडणूक निशाणी धनुष्यबाण ही ठळकपणे रेखाटली आहे. त्यामुळे हा संदेश कुणासाठी आहे आणि कुणासाठी नाही, हे अगदी स्पष्ट होते.

या पाटीची खास गोष्ट म्हणजे याच पॅनलमधून सचिन पोटे यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या एका राजकीय उमेदवाराच्या नजरेस ही पाटी पडली.

मात्र, राजकीय वैर बाजूला ठेवत त्याने खिलाडूवृत्ती दाखवली. आणि या ‘पुणेरी टाईप’ पाटीचा फोटो काढून तो थेट सचिन पोटे यांनाच पाठवला. या प्रतिस्पर्ध्यानेही या कल्पकतेला दिलेली दाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, या पाटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, त्यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. कुणी ‘हीच खरी पुणेरी स्टाईल’ म्हणत कौतुक करत आहे, तर कुणी ‘डोअर टू डोअर प्रचाराला थेट ब्रेक’ अशी मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.

पाटी बनली चर्चेचा विषय

एकूणच काय, तर केडीएमसी निवडणुकीच्या रणधुमाळीत कल्याण पूर्वेतील ही पुणेरी टाईप पाटी केवळ सूचना न राहता, राजकीय चर्चेचा आणि मनोरंजनाचाही विषय ठरली आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली