ठाणे

डोंबिवलीत गांज्याचा मोठा साठा जप्त,दोन तस्करांना अटक

वृत्तसंस्था

डोंबिवली आणि आसपासच्या भागात वितरणासाठी आणलेला गांज्याचा मोठा साठा या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून दोघा तस्करांना अटक केली. या बदमाश्यांकडून कारसह विक्रीसाठी आणलेला तब्बल २७२ किलो ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. फैसल फारूख ठाकुर (२१, रा. माझगाव, मुंबई) आणि मोहम्मद आतीफ हाफीज उल्ला अन्सारी (३२, वर्षे रा. गैबीनगर, भिवडी) याप्रकरणी यांना अटक करण्यात आली आहे.

डोंबिवली जवळच्या ग्रामीण भागात अवैध गांजा (अंमली पदार्थाची) विक्री होत असल्याची माहिती मानपाडा पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल भिसे आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी उंबार्ली गावाच्या हद्दीत फिल्डींग लावली होती.

इतक्यात एक इन्होव्हा कार संशयास्पदरित्या येऊन थांबताच पोलिसांनी या कारवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी थरारक पाठलाग करत या कारला मोठ्या धाडसाने थांबवले.

कारमध्ये असलेल्या इसमांसह कारची तपासणी केली असता, त्यात २७२ किलो वजनाचा गांजा वेगवेगळ्या प्लास्टीकच्या पिशव्यांमध्ये आढळून आला.

राज्य सरकारच्या धर्तीवर ‘ड्युटी पॅटर्न’ राबवा; परिचारिकांच्या शेकडो रिक्त पदांमुळे कामाचा ताण

मोदींनंतर अमित शहा पंतप्रधान! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा

ज्योतिषानं काढली भाजप-काँग्रेसची कुंडली अन् थेट सांगितला लोकसभेचा निकाल; नेटकरी घेतायेत मजा

Mumbai: नाश्ता बनवला नाही म्हणून पतीने पत्नीवर केले हातोड्याने वार, कुर्ला येथील घटना

भुयारी मेट्रोची दादर स्थानकापर्यंत चाचणी; पहिल्या टप्यातील मेट्रो धावण्याची तारीख लवकरच जाहीर होणार