अतुल जाधव/ ठाणे : विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्याने अनपेक्षित कौल दिला असून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला असून जिल्ह्यात १८ पैकी १६ जागांवर महायुतीने बाजी मारल्याचे दिसत असून महाविकास आघाडीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. जिल्ह्यात ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसेला खाते देखील खोलता आले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात भाजपने ९ पैकी ९, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ पैकी ६ जागा, तर अजित पवार यांनी २ पैकी १ जागा जिंकली आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला १ जागा मिळाली. ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी १६ जागांवर महायुतीने विजय मिळविला आहे, तर केवळ दोनच जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी ९ जागा भाजपने लढविल्या. यामध्ये भिवंडी पश्चिमेतील उमेदवार महेश चौगुले, मुरबाडमधील उमेदवार किसन कथोरे, उल्हासनगरमधील उमेदवार कुमार आयलानी, कल्याण पूर्वमधील उमेदवार सुलभा गायकवाड, डोंबिवलीमधील उमेदवार रवींद्र चव्हाण, मीरा-भाईंदरमधील उमेदवार नरेंद्र मेहता, ठाणे शहरमधील उमेदवार संजय केळकर, ऐरोलीमधील उमेदवार गणेश नाईक, बेलापूरमधील उमेदवार मंदा म्हात्रे यांचा समावेश होता. हे सर्वच उमेदवार विजयी झाले. याच विजयाबरोबर एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यातील वर्चस्व देखील वाढले आहे. त्यामुळे ठाणे हा शिंदे गटाचाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्ष १ विजयी
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दोन मतदारसंघ शहापूर विजयी, तर कळवा-मुंब्रा (पराभव)
शिवसेना ७ मतदारसंघांत विजयी
भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, कल्याण ग्रामीण हे सहा उमेदवार विजयी झाले तर, भिवंडी पूर्वमधील उमेदवार संतोष शेट्टी यांचा पराभव झाला.
भाजप ९ मतदारसंघांत विजयी
भिवंडी पश्चिम, मुरबाड, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली,
मीरा-भाईंदर, ठाणे शहर, ऐरोली, बेलापूर
राष्ट्रवादी शरद पवार गट १ विजयी
कळवा-मुंब्रा मतदारसंघ
ठाणे जिल्ह्यातील १८ विजयी उमेदवार
१३४ भिवंडी ग्रामीण :
शांताराम मोरे ( शिवसेना) १२७२०५
महादेव अंबो (उबाठा) ६९२४३
१३५ शहापूर :
दौलत दरोडा (कॉंग्रेस) ७३०८१
हरिश्चंद्र खंडवी (मनसे) ५६४८
१३६ भिवंडी पश्चिम
महेश चौघुले (भाजप) ७०१७२
रियाज आझमी (सपा) ३८८७९
१३७ भिवंडी पूर्व
रईस शेख (स. पार्टी ) ११९६८७
संतोष शेट्टी (शिवसेना) ६७६७२
१३८ कल्याण पश्चिम
विश्वनाथ भोईर (शिवसेना) १२६०२०
सचिन बसरे (उबाठा) ८३५६६
१३९ मुरबाड :
किसन कथोरे (भाजप) १७५५०९
सुभाष पवार (मविआ) १२२१४६
१४० अंबरनाथ :
डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना) १११३६८
राजेश वानखेडे (उबाठा) ५९९९३
१४१ उल्हासनगर :
कुमार आयलानी (भाजप) ८२२३१
ओमी कलानी (काँग्रेस) ५१४७७
१४२ कल्याण पूर्व :
सुलभा गणपत गायकवाड (भाजप) ८१५१६
महेश गायकवाड (अपक्ष) ५५१०८
१४३ डोंबिवली :
रवींद्र चव्हाण (भाजप) १,२३,८१५
दीपेश म्हात्रे (उबाठा) ४६७०९
१४४ कल्याण ग्रामीण :
राजेश मोरे (शिवसेना) १४११६४
प्रमोद पाटील (मनसे) ७४७६८
१४५ मीरा-भाईंदर :
नरेंद्र मेहता (भाजप) १४४३७६
मुजफ्फर हुसेन (काँग्रेस) ८३९४३
१४६ ओवळा माजिवडा :
प्रताप सरनाईक (शिवसेना) १,०९११६
नरेश मनेरा (उबाठा) ७६,०२०
१४७ कोपरी पाचपाखाडी :
एकनाथ शिंदे (शिवसेना) १५९०६०
केदार दिघे (उबाठा) ३८३४३
१४८ ठाणे :
संजय केळकर (भाजप) १२०३७३
राजन विचारे (उबाठा) ६२१२०
१४९ मुंब्रा-कळवा :
जितेंद्र आव्हाड (श. पवार) १५१४१
नजीब मुल्ला (अ. पवार) ६०९१३
१५० ऐरोली :
गणेश नाईक (भाजप) १४४२६१
विजय चौघुले (अपक्ष) ५२३८१
१५१ बेलापूर :
मंदा म्हात्रे (भाजप) ९१,८५२
संदीप नाईक (राष्ट्रवादी) ९१,४७५
१९० उरण :
महेश बालदी (भाजप) ९५३९०
गजानन भोईर (शिवसेना) ६९८९३
१९१- पेण-सुधागड-रोहा :
रवीशेठ पाटील (महायुती) १,२४,६३१
प्रसाद भोईर (उबाठा) ६३,८२१