ठाणे

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण : महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. तसेच राहुल पाटील यांच्यावरही गोळीबार झाला होता.

Swapnil S

ठाणे : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेला शिंदे गटाचा कार्यकर्ता महेश गायकवाड यांना सोमवारी ठाण्याच्या ज्युपिटर हॅास्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. महेश गायकवाड शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारी रोजी गोळीबार करण्यात आला होता. तब्बल २४ दिवसानंतर सोमवारी महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी २ फेब्रुवारी रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. या वादातूनच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. तसेच राहुल पाटील यांच्यावरही गोळीबार झाला होता. दोघांना तातडीने ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या गोळीबार प्रकरणात उल्हासनगर चोपडा कोर्टाकडून आमदार गणपत गायकवाडसह पाच जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. सर्व आरोपींना तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी