माथेरानमध्ये पार्किंगसाठी पाच एकर जागा मंजूर; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, पार्किंगचा प्रश्न सुटण्याची आशा 
ठाणे

माथेरानमध्ये पार्किंगसाठी पाच एकर जागा मंजूर; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, पार्किंगचा प्रश्न सुटण्याची आशा

माथेरानमधील पार्किंगची अनेक वर्षांपासूनची गंभीर समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महसूल विभागाच्या बैठकीत माथेरानसाठी पाच एकर जागा पार्किंग उभारण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे.

Swapnil S

माथेरान : माथेरानमधील पार्किंगची अनेक वर्षांपासूनची गंभीर समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महसूल विभागाच्या बैठकीत माथेरानसाठी पाच एकर जागा पार्किंग उभारण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. या जागेवर माथेरान नगरपरिषदेच्या माध्यमातून सुसज्ज पार्किंग प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या जागेची मागणी माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी महसूल विभागाकडे केली होती. नगरपरिषदेला हक्काची पार्किंगची जागा उपलब्ध झाल्याने शहरातील वाहतूक आणि पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. माथेरानमधील पार्किंगसाठी जागेचा प्रश्न सन २००७ पासून प्रलंबित होता. माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी ‘वाडिया सॅनिटोरियम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेसाठी प्रयत्न सुरू केले होते.

विकासाला नवी चालना मिळणार

गेल्या दोन वर्षांत मनोज खेडकर यांनी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. अखेर पार्किंगसाठी हा भूखंड नगरपरिषदेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाल्याने माथेरानच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे. या निर्णयाबद्दल लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.

ठाण्यात ४० टक्के पाण्याची गळती; आमदार संजय केळकर यांचा आरोप

Mumbai : उच्च न्यायालयाचा पोलीस अधिकाऱ्याला २५ हजारांचा दंड; FIR ची प्रत नाकारणे अधिकाऱ्याला भोवले

वळगणीच्या 'चिवनी' मच्छीला ग्राहकांची पसंती; अवघ्या २० ते २५ दिवसांचीच उपलब्धता; बाजारात मोठी मागणी

मुंबईकरांना मिळणार पुनर्प्रक्रिया केलेले पिण्यायोग्य पाणी; भांडुपमध्ये तृतीय स्तरावरील प्रक्रिया केंद्राला मंजुरी, १ हजार ८२४ कोटींचा प्रकल्प

Mumbai : वन्यजीव तस्करी टोळीचा DRI कडून पर्दाफाश; बंदिस्त अवस्थेतील दुर्मिळ प्राण्यांची सुटका